ऑनलाईन टीम / बीजिंग :
तिबेट एअरलाईन्सचे विमान टेकऑफ दरम्यान धावपट्टीवर घसरल्याने विमानाला भीषण आग लागली. आज सकाळी 8 च्या सुमारास चोंगकिंग जियांगबेई इंटरनॅशनल एअरपोर्टवर ही घटना घडली. या विमानात 113 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. त्यामधील काही जण जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Tibet Airlines flight deviates from the runway and caught fire when it took)
मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट एअरलाईन्सचे विमान चोंगकिंग जियांगबेई इंटरनॅशनल एअरपोर्टवरुन सकाळी 8 वाजता चोंगकिंगहून न्यांगचीसाठी टेकऑफ करत होते. टेकऑफ दरम्यान विमान धावपट्टीवर घसरले. त्याचवेळी विमानाला आग लागली. क्षणार्धात आगीने उग्र रुप धारण केले. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला असून विमानाला आग लागल्याचं यात स्पष्टपणे दिसत आहे. तसंच ही आग विझवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याचं यात दिसून येत आहे.