देशात नद्यांच्या पाण्यामुळे शेती मोठ्या प्रमाणात होते. पण आता या नद्याचे क्षेत्र जलपर्णी व्यापत आहेत. त्यामुळे यावर उपाय कोणते या चिंतेत सर्वजण आहेत. पण काळजी करू नका… उपाय सापडला आहे. एक किडा आहे, जो ही जलपर्णी फस्त करू शकतो.
जलपर्णी ही वनस्पती आपल्याला मुख्यतः नदीमध्ये पसरलेली दिसते. ही वनस्पती प्रचंड वेगाने वाढते. त्यामुळे नदीपात्र काही दिवसातच आपल्या कब्ज्यात घेते. बऱ्याचवेळा जलपर्णी पात्राबाहेर काढण्याचे काम होते. पण काही दिवसात पुन्हा ती आपली जागा घेते. त्यामुळे सर्वांपुढे आवाहन उभे राहिले आहे. भारतातच नव्हे तर विदेशातही हीच समस्या जाणवत आहे.
दक्षिण आफ्रिकेत यावर संशोधन करण्यात येत आहे. जलपर्णी हटविण्यासाठी या वनस्पतीचे नैसर्गिक दुश्मन शोधत आहेत. संशोधकांना यात सफलता मिळाली आहे. चार मिलिमीटरचा एक किडा जलपर्णी फस्त करू शकतो. या किड्याचे नाव आहे टोळ, हिंदीमध्ये याला टिडडा तर इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ असे म्हणतात.
या किड्याची वाढ देखील जलपर्णी सारखी तेजीत होते आणि यांची भूकही खूप असते. म्हणून यांना भुक्कड म्हणूनही ओळखले जाते. बघता – बघता ते झाडाची पाने फस्त करतात. रॉड्स विद्यापीठात या किड्यांची पैदास करण्यात येत आहे.
परंतु याचे काही तोटे सुद्धा आहेत. कारण इतर पिकांना नुकसान झाल्यास, या किड्यावर नियंत्रण मिळविणे अवघड होणार आहे. त्यामुळे संशोधनादरम्यान इतर पिकांवरही टोळ किडे सोडून टेस्टिंग केले जात आहे. ज्यामुळे इतर पिके यापासून सुरक्षित राहतील.
सध्या तरी हा प्रयोग द. आफ्रिकेत करण्यात येत आहे. येत्या काही दिवसात हा प्रयोग इतर ठिकाणी करता येणार आहे. त्यामुळे जलपर्णीपासून आपल्याला सुटका मिळणार का हे काही दिवसात स्पष्ट होईल.