Tarun Bharat

राधानगरीच्या जंगलात वाघाचे दर्शन

कोल्हापूर,- वन्यजीव विभागाच्या कॅमेऱ्यात आज पट्टेरी वाघाचे छायाचित्र टिपले गेले. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षण करिता ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून १०० ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यात आले होते. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी दाजीपूर जंगलामध्ये लावण्यात आला असून पंचवीस दिवस वन्य जीवन निरीक्षणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. दिनांक ११ एप्रिल २०२२रोजी सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. २३ एप्रिल २०२२ रोजी लावलेल्या ट्रॅप कॅमेरा मध्ये पुर्ण वाढ झालेला पट्टेरी वाघ छायाचित्रीत झाला आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते. परंतु त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नाही. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेरा करिता निधी मिळाल्यामुळे या वाघाचे अस्तित्व मिळाल्यामुळे वन्यजीव प्रेमी पालकमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहेत. जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अनिरुद्ध माने यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली, असे नमूद केले.
वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा- वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरी वाघाचे पट्टे सॉफ्टवेअर वर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ते मॅच झाले तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला आहे, असे निष्कर्ष काढण्यात येतील. जर ते पट्टे मॅच झाले नाहीत तर या वाघाची उत्पत्ती राधानगरी अभयारण्यातच झाली असा निष्कर्ष काढण्यात येईल.प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Stories

भारत-पाक सामना देशहित आणि राष्ट्रधर्माविरुद्ध

datta jadhav

महाराष्ट्रात उद्यापासून कोरोनामुक्त भागात वाजणार शाळेची घंटा

Archana Banage

चित्रा वाघ म्हणतात, क्या हुवा तेरा वादा….जयंतरावजी..

Archana Banage

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल; दुसरा अर्ज कोणाचा? वाचा सविस्तर…

Archana Banage

असंघटित यंत्रमाग कामगारांसाठी घेण्यात आला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Archana Banage

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

datta jadhav