Tarun Bharat

चंदगडच्या गंधर्वगड-केरवडे परिसरात वाघ

चंदगड- चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागातील गंधर्वगडाच्या पायथ्याशी तसेच केरवडे गावच्या हद्दीत वाघाचा वावर असून पंचक्रोशीत भितीचे वातावरण पसरले आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास या भागात वाघाचे दर्शन झाले. गेल्या काही महिन्यापासून चंदगडच्या तिल्लारी परिसरात वाघाचे दर्शन झाले होते. त्यानंतर काल गंधर्वगडाच्या पायथ्याशी वाघाचे दर्शन झाले. मात्र हा वाघ आहे का बिबट्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

गेल्या आठवडय़ापासून या परिसरात वाघाचा वावर असून त्याचे ठसे अनेकांनी पाहिले होते. वाघाच्या वावरण्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू होती. परंतु प्रत्यक्षात वाघ कुणाला दिसलेला नव्हता. मात्र रविवारी संध्याकाळच्या सुमारास केरवडे- गंधर्वगड दरम्यान वाघाचे दर्शन झाले. वाघ पूर्ण क्षमतेने वाढलेला असून तो पट्टेरी असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. गंधर्वगड, वाळकुळी, केळवडे येथे भक्ष्याच्या शोधात वाघ फिरत असून त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. लोक घरातून बाहेर पडायलाही घाबरत आहेत. रविवारी संध्याकाळी वाघ इतक्या जवळ आला होता की अनेकांनी वाघाचे चित्रीकरण केले. या घटनेची चित्रफित पोलीस पाटील मारुती गावडे यांनी वनविभागाला पाठवली आहे. वनविभागाने तातडीने या वाघाचा बंदोबस्त करून हा वाघ जंगल भागात पिटाळावा, अशी मागणी गंधर्वगड पंचक्रोशीतील लोकांनी केली आहे.

Related Stories

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शहर; हाय अलर्ट जारी

Tousif Mujawar

राजकीय प्रवासात मगो पक्षाची नितीमुल्ये जपली

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर मेन रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

तिन्ही भाषांमधून परिपत्रके द्या

Amit Kulkarni

कोरोना लढा : भारतीय ऑलिम्पिक महासंघाचाही पुढाकार

Patil_p

महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 66 रूग्ण : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहीती

Tousif Mujawar