Tarun Bharat

डिचोली पत्रकार संघातर्फे टिळक पुण्यतिथी साजरी

Advertisements

प्रतिनिधी /डिचोली

डिचोली पत्रकार संघातर्फे दरवषीप्रमाणे लोकमान्य टिळक पुण्यतिथी तथा पत्रकार दिन पत्रकार कक्षात साजरा करण्यात आला. ज्ये÷ पत्रकार विशांत वझे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी, सचिव तुकाराम सावंत, सहसचिव समीर उमर्ये, सहखजिनदार विनायक सामंत, कायदा सल्लागार ऍड. जीवन कळंगुटकर, सल्लागार दुर्गादास गर्दे, महेश गोवेकर, उदय परब, दिलीप देसाई आदींची उपस्थिती होती.

काही समाजकंटकांकडून पत्रकारांना लक्ष्य बनविले जाते. अशा घटकांकडून पत्रकारांना सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कायद्यात केलेली दुरुस्ती ही चांगली बाब आहे. या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत पत्रकारांवर हल्ला करणाऱयांना कडक शिक्षा व्हावी. ग्रामीण पत्रकारांच्या इतर समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेले आश्वासन पाळावे व ग्रामीण भागातील पत्रकारांना समाविष्ट करून घेणाऱया योजना आखाव्यात, अशी मागणी यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज च्यारी यांनी केली.

ऍड. जीवन कळंगुटकर, तुकाराम सावंत यांनीही आपले विचार मांडले. सूत्रसंचालन दुर्गादास गर्दे यांनी केले तर आभार दिलीप देसाई यांनी मानले.

Related Stories

कृषी खात्याने राज्याला ‘आत्मनिर्भर’ बनवावे : मुख्यमंत्री

Patil_p

पाऊलखुणा सोडत ‘ग्रीन सी टर्टल’ ‘सागर’वासी

Patil_p

बार्देशात पाच, सात दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन

Amit Kulkarni

मंत्री दीपक पाऊसकरांकडून दिया सावर्डेकरचे अभिनंदन

Omkar B

रावण कॉलनी आगीच्या भडक्मयात काजू बागायत जळून खाक

Amit Kulkarni

गौण खनिज आयातीसाठी यापुढे परवाना सक्तीचा

Patil_p
error: Content is protected !!