Tarun Bharat

टिळक हायस्कूलचा समावेश राज्यातील 50 शाळांमध्ये करणार

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा; शताब्दी समारोहास भेट

प्रतिनिधी/ कराड

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना राज्यात जे मोठे नेते होऊन गेले,   ते शिकलेल्या शाळांना राज्य शासनाने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा राज्यातील 50 शाळांमध्ये शिक्षण मंडळ कराड व टिळक हायस्कूलचा समावेश करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केली.

शिक्षण मंडळ कराडच्या शताब्दी समारोहास नामदार केसरकर यांनी रविवारी सायंकाळी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिक्षण मंडळ कराडचे चेअरमन बाळासाहेब कुलकर्णी, सचिव चंद्रशेखर देशपांडे, अनघा परांडकर, डॉ. अनिल हुद्देदार यांची उपस्थिती होती.

मंत्री केसरकर म्हणाले की, राज्यात मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्याची अपेक्षा करताना शिक्षकांचे प्रश्न सोडवणे आहे. यासाठी शासनाने राज्यातील 61 हजार शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी 1100 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. दरवर्षी अशी तरतूद करण्यात येणार आहे. शिक्षण मंडळ कराड ही संस्था कराडचे नव्हे तर महाराष्ट्राचे वैभव आहे. ही संस्था गेली 100 वर्षे अव्याहतपणे सुरू आहे, याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्यामुळेच शासन मदत करणाऱया 50 शाळांमध्ये या संस्थेचा समावेश केला जाईल. त्याचबरोबर संस्थेचे अन्य प्रश्नही मुंबईतील बैठकीत मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर संस्थेला व्यक्तिगत देणगीही देणार आहे.

आज मुले मोठय़ा प्रमाणात इंग्रजी शिक्षणाकडे वळत आहे. त्यांचे कारण देशात उच्च शिक्षण इंग्रजीमधून आहे. जर्मनी, रशियासारख्या देशात उच्च शिक्षणही मातृभाषेतून दिले जाते. या देशांनी मोठमोठे शास्त्रज्ञ दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुलांचे शिक्षण मातृभाषेतूनच दिले जावे, अशा प्रकारच्या शैक्षणिक धोरणाचा आग्रह केला आहे. देशातील आजची पिढी उद्या जगावर राज्य करणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

शिक्षण मंडळाचे सचिव चंद्रशेखर देशपांडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेतील विविध गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

सीता राम हादगे 24×7 ऑनफिल्ड

datta jadhav

महाडिबीटी प्रणालीवरील शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ

datta jadhav

सातारा शहरात संसर्ग आटोक्यात

datta jadhav

सातारा : १३८ रिपोर्ट निगेटिव्ह तर एक मृताचा स्त्राव पाठवला तपासणीला

Archana Banage

केंद्र शासनाच्या योजना आणि निधी बाबत पाठपुरावा करणार : खा. श्रीनिवास पाटील

Archana Banage

सातारा जिल्हयात रेकॉर्ड ब्रेक; 263 बाधीत

Archana Banage