प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने शनिवारी लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. रामलिंगखिंड गल्ली येथील टिळक चौक येथे हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर, उपशहरप्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, राजू कणेरी, संजय देसाई, दशरथ गवळी, गजानन चौगुले यासह इतर शिवसैनिक उपस्थित होते.