25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान सीपीएड मैदानावर आयोजन
प्रतिनिधी/ बेळगाव
तरुण भारत पुरस्कृत ‘घरकुल 2022’ प्रदर्शनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम शनिवारी थाटात संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगावचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी व त्यांच्या पत्नी रश्मी रामगुरवाडी यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. 25 ते 30 नोव्हेंबरदरम्यान सीपीएड मैदानावर भव्य प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम-बेळगाव आयोजित व कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बेळगाव यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन होणार आहे.
गृहनिर्माण क्षेत्रासाठी लागणारे साहित्य एकाच छताखाली प्रदर्शनात मिळणार आहे. गृहनिर्माण क्षेत्रामध्ये दिवसागणिक बदल होत असून नव्या संकल्पना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने ‘घरकुल’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. सिमेंट, मॉडर्न किचन, इंटिरियर, लाईट्स, फायनान्स, टाईल्स, फर्निचर, सजावटीचे साहित्य प्रदर्शनात पाहता येणार आहे. याचसोबत खाद्य पदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यामध्ये चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. प्रदर्शनात 170 हून अधिक स्टॉल्स असल्याने नागरिकांसाठी ही पर्वणी असणार आहे.
उत्कर्ष जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष संग्राम पाटील, इन्व्हेंट चेअरमन सी. आर. पाटील, सेपेटरी आनंद कोहळ्ळी, आदर्श मुचंडी, महेश आरबुळे, राजेंद्र उपाध्ये, राजू होंगल, सादिक इनामदार, महेश मोरे, मल्लिकार्जुन पाटील, उल्हास यकुंडी, विरेश शेट्टण्णावर, रमेश जेटी, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष कुलदीप हंगीरगेकर, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष उमेश रामगुरवाडी, इन्व्हेंट चेअरमन आनंद चौगुले, सोमनाथ कुडचीकर, महेश अनगोळकर, चंद्रकांत राजमाने, प्रसाद कट्टी, गीता गायकवाड, बी. के. पाटील, रश्मी रामगुरवाडी, विजय पाटील, डी. बी. पाटील, तरुण भारतचे सीएमओ उदय खाडिलकर, जाहिरात व्यवस्थापक सोहन पाटील, संदीप जोग, अमित असलकर, विनय पाटील, कल्मेश हन्नुरकर, सुहास देशपांडे, अमित कोळेकर यासह इतर उपस्थित होते.