Tarun Bharat

घरभाडे वाढल्याने कारमध्ये झोपण्याची वेळ

Advertisements

अमेरिकेत लाखो लोक बेघर, जिममध्ये आंघोळ

अमेरिकेत घरभाडय़ाची रक्कम वाढल्याने लोक घर सोडून कारमध्ये राहू लागले आहेत. तर आंघोळीसाठी जिममध्ये जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. इंटरनेटचा खर्च वाचविण्यासाठी वायफायकरता लायब्ररीत जात आहेत. मागील एक वर्षात घरभाडे 24-28 टक्क्यांनी वाढले आहे. सरकारकडून लोकांना सोशल सिक्युरिटी अंतर्गत 1200 डॉलर्स दर महिन्याला मिळतात.

तर घराचे किमान भाडे 1500 डॉलर्स असते. यामुळे लोक स्वतःच्या कारमध्येच राहत आहेत. जिममध्ये महिन्याचे 40-50 डॉलर्स शुल्क देऊन आंघोळीची व्यवस्था करत आहेत. लायब्ररीची मेंबरशिप इतक्याच खर्चात मोफत वाय-फाय मिळवून देत आहे. केवळ खाण्यावर खर्च होत तो कमी करण्यासाठी उपवास करण्याचा प्रकारही वाढला आहे.

बेघर एलिट

बोस्टनमधील पारंपरिक उच्चवर्गाचे लोक हार्वर्डसारख्या विद्यापीठाशी जोडले गेले आहेत, त्यांना बोस्टन एलिट म्हणून ओळखले जाते. याच धर्तीवर झोपण्यासाठी स्वतःची कार असणाऱया बेघर लोकांना बेघर एलिट म्हटले जाते. असे लोक  स्वतःसाठी आवश्यक सामग्री गाडीत भरून स्टेल्थ कँपिंग करतात. म्हणजे स्वतःच्या गाडीतच झोपतात. स्वतःच्या वाहनात झोपणाऱया लोकांची संख्या आता 5 लाखांपर्यंत पोहोचल्याचे मानले जात आहे.

Related Stories

सौरऊर्जेद्वारे धावणारी कार लवकरच

Patil_p

एकाच नावाचे 178 लोक आले एकत्र

Patil_p

चीनमध्ये आहे विचित्र परंपरा

Patil_p

वरदक्षिणेच्या स्वरुपात देतात 21 साप

Amit Kulkarni

चेहऱयावर टॅटूसह अँकरिंग

Amit Kulkarni

त्यांच्या डोळय़ात पाहून तरी बघा

Patil_p
error: Content is protected !!