Tarun Bharat

टीना दत्ताला मिळाला मोठा चित्रपट

दाक्षिणात्य चित्रपटात मुख्य भूमिका

वादग्रस्त रियॅलिटी शो ‘बिग बॉस’ने अनेक स्पर्धकांचे नशीब उजळविले आहे. या शोमधून बाहेर पडलेल्या सदस्यांना अनेक ऑफर्स मिळतात. निमृत कौर अहलूवालियापासून शालीन भनोट या बिग बॉस 16 मधील अनेक स्पर्धकांना ऑफर्स मिळाल्या आहेत. आता या यादीत टीव्ही अभिनेत्री टीना दत्ताचे नाव सामील झाले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटातील बिगबजेट चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी टीनाची निवड झाली आहे. बिग बॉस 16 मधून बाहेर पडल्यावर टीना या चित्रपटाच्या चित्रिकरणात सामील होणार आहे. हा चित्रपट तेलगू असून तिचा दक्षिणेतील पदार्पणाचा चित्रपट ठरणार आहे.

टीना दत्ता या चित्रपटात एका श्रीमंत राजकीय नेत्याच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. टीना दत्ता ही मागील अनेक वर्षापासून टीव्ही मालिकांमध्ये काम करत आहे. अभिनेत्रीने वयाच्या केवळ 5 व्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. बंगाली चित्रपटसृष्टीत ती सक्रीय होती, त्यानंतर तिने हिंदी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. ‘उतरन’मधील भूमिकेसाठी टीनाला ओळखले जाते. ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. याचबरोबर ‘डायन’ या मालिकेतही तिने काम केले आहे. टीनाच्या दाक्षिणात्य चित्रपटांमधील पदार्पणाची प्रतीक्षा आता तिचे चाहते करत आहेत.

Related Stories

कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष यांना जामीन मंजूर

Tousif Mujawar

30 किलो कोकेन खाणाऱया अस्वलावर चित्रपट

Patil_p

प्रसिद्ध तेलुगू अभिनेते चलपती राव यांचे निधन

datta jadhav

पॅरिस हिल्टनला मिळाला नवा जोडीदार

Patil_p

झहीरसोबत रिलेशनशिपमध्ये सोनाक्षी

Patil_p

जास्मीन भसीन करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Patil_p