Bhindi fry: सहज बनवता येणारी ,झटपट आणि स्वादिष्ट डिश आज आपण पाहणार आहोत.बऱ्याच वेळेला काहीतरी चटपटीत खाण्याचा मोह होतो,त्यासाठी भेंडी फ्राय हा एक उत्तम पर्याय आहे. पराठा, नान, पोळी, तंदूरी रोटी, भात, मसाले भात अशा सगळ्याच पदार्थासोबत भेंडी फ्राय चवदार लागते. मग चला आज भेंडी फ्राय कशी बनवतात ते पाहुया.
साहित्य
२५० ग्राम ताजी कोवळी भेंडी.
एक चमचा तांदळाचे पीठ.
एक चमचा मैदा.
एक चमचा बेसनपीठ.
पाव चमचा धनापावडर .
पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर.
एक चमचा लाल तिखट
पाव चमचा हिंग.
पाव चमचा ओवा.
थोडासा लिंबाचा रस.
आणि चवीनुसार मीठ.
कृती
सर्वप्रथम भेंडी स्वच्छ धुऊन कापडाने पुसून घ्या.
यानंतर भेंडीचे वरचे टोक कापून उभे ५ ते ६ काप करा.
सर्व भेंडी कापल्यानंतर त्यामध्ये वरून एक चमचा तांदळाचे पीठ.,एक चमचा मैदा,एक चमचा बेसनपीठ, एक चमचा लाल तिखट लालतिखट, पाव चमचा धनापावडर, पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, पाव चमचा हिंग, १ छोटा चमचा ओवा टाकून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करावे.
भेंडी तळायला घेती वेळी मीठ मिक्स करावे त्यामुळे भेंडी छान कुरकुरीत होते.
कुरकुरीत भेंडीला मस्त असा स्वाद येण्यासाठी वरून थोडासा लिंबाचा रस टाका.
लिंबाचा रस टाकल्यानंतर भेंडी हलकीशी ओलसर होते त्यामुळे हाताने मिक्स केल्यानंतर तांदळाचे पीठ, बेसनपीठ, मैदा व बाकी मसाल्यानी भेंडी व्यवस्थित कोट होते.
यानंतर गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवावे.
तेल गरम झाल्यांनतर भेंडीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून मिक्स करून भेंडी मध्यम आचेवर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यावी.
ही तळलेली कुरकुरीत गरमागरम भेंडी तुम्ही चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स सोबत देखील खाऊ शकता.