वृत्तसंस्था / तिरुपती
देशातील सर्वात धनाढय़ देवस्थानांपैकी एक तिरुपती बालाजी मंदिरात एका दिवसात 6.18 कोटी रुपयांची दान प्राप्ती झाली आहे. हा एकप्रकारे विक्रमच आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या इतिहासात भगवान वेंकटेश्वराच्या दानपात्रात सोमवारी 6.18 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. देवस्थाननुसार पहिल्यांदाच दानप्राप्तीची रक्कम 6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे.
यापूर्वी 1 एप्रिल 2012 रोजी 5.73 कोटी रुपयांचे दान प्राप्त झाले होते. आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर समुद्रसपाटीपासून 2800 फूटांच्या उंचीवर आहे. या मंदिराची एकूण संपत्ती सुमारे 50 हजार कोटी रुपयांची असल्याचे बोलले जाते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी तिरुपती मंदिरात जात दर्शन घेतले होते.