Tarun Bharat

परंपरेनुसार आई अंबाबाईला तिरूपती देवस्थानकडून शालू अर्पण…

Advertisements

कोल्हापूर : तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून गुरूवारी करवीर निवासिनी अंबाबाईला सोनेरी रंग लाल काठ-पदराचा १ लाख १० हजाराचा शालू अर्पण करण्यात आला. त्याच बरोबर बांगड्या, ओटी, तिरुपती चा प्रसाद तिरुमला देवस्थान समितीचे अध्यक्ष सुभा रेड्डी, सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी हा शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे सुपूर्त केला. त्यानंतर देवस्थान समितीकडून या महावस्त्राची रितसर पावती करुन त्याचा स्वीकार करण्यात आला.

तिरुपती देवस्थानकडून नवरात्रोत्सवात देशभरातील विविध शक्तीपीठांना महावस्त्र किंवा शालू अर्पण केला जातो. त्यानुसार करवीर निवासिनी अंबाबाईलाही कित्येक वर्षापासून हा शालू अर्पण केला जात आहे. यावर्षी आज जयघोष करत शालू मंदिरात आणण्यात आला विधीवत मंत्रोपचारामध्ये शालू देवस्थान समितीच्या ताब्यात देण्यात आला.

हे ही वाचा : कोल्हापुरात पर्यटक आणि भाविकांना फटका; रणरणत्या उन्हात बोचणाऱ्या खडीतून दर्शनासाठी पायापीठ

Related Stories

कोल्हापुरात व्यापारी, प्रशासन पुन्हा आमने-सामने

Abhijeet Shinde

मोठी बातमी : कोरोनामुळे आयपीएल स्थगित;बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांची घोषणा

Abhijeet Shinde

देशभरातील मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त उत्साहाचं वातावरण

Sumit Tambekar

क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी

Sumit Tambekar

मनसेला सोबत घेतल्यास भाजपा-शिंदे गटाला फटका

datta jadhav

धामणी खोऱ्यात कोरोनाचे पुन्हा दोन रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!