Tarun Bharat

दमदार नफ्यामुळे टायटनचे समभाग चमकले

Advertisements

वृत्तसंस्था/ मुंबई

टाटा ग्रुपच्या टायटनचे समभाग सोमवारी 2 टक्के इतके वाढले होते. पहिल्या तिमाहीतील दमदार नफ्यातील कामगिरीचा परिणाम समभागावर दिसला होता.

टायटनच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यामध्ये मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेत 13 पट वाढ झाली असून जूनअखेरच्या तिमाहीत नफा 793 कोटी रुपयांवर राहिला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत कंपनीने 61 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असणाऱया टायटनच्या समभागाने सोमवारी शेअर बाजारात सुरूवातीच्या सत्रात 2 टक्के इतकी तेजी राखली होती. समभागाचा भाव बीएसईवर 2474 रुपये इतका होता. राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या पत्नीची यात 5 टक्के हिस्सेदारी आहे. 

Related Stories

आकाश अंबानींचा ‘टाइम100 नेक्स्ट’ यादीत समावेश

Patil_p

टाटा समूहाची 5-जी क्षेत्रात प्रवेश करण्याची कोणतीही योजना नाही

Patil_p

आला 7000 एमएएच बॅटरीचा मोबाईल

Patil_p

सामाजिक सुरक्षा योजना

Omkar B

अपना स्टार्टअप कंपनी युनिकॉर्न क्लबमध्ये

Patil_p

सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय धोरणात काय हवे?

Patil_p
error: Content is protected !!