वकील संघटना आयोजित अॅड. प्रिमियर लीग : सुनील सक्री मालिकावीर-सामनावीर, प्रभू लायन्स उपविजेता
बेळगाव : वकील संघटना आयोजित अॅड. प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बारुदवाले-मांगलेकर वॉरियर्स संघाने प्रभू लायन्स संघाचा 24 धावांनी पराभव करून अॅड. प्रिमियर लीग चषक पटकाविला. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या सुनील सक्रीला सामानावीर व मालिकावीर पुस्कार देण्यात आला. य् ाgनियन जिमखाना मैदानावर आयोजित अॅड. प्रिमियर लीग स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बारुदवाले-मांगलेकर वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 2 गडी बाद 99 धावा केल्या. त्यात सुनील सक्रीने 4 षटकार 1 चौकारासह 43, गुरुप्रसाद पोतदारने 3 षटकार व 4 चौकारासह 40 धावा केल्या. प्रभू लायन्सतर्फे किरण पाटीलने 13 धावात 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना प्रभू लायन्स संघाने 8 षटकात 6 गडी बाद 75 धावाच केल्या. त्यात राजेशने 2 षटकार 2 चौकारासह 28, किरण पाटीलने 16 तर जुनेद इनामदार व शिवाजी पाटील यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या. बारुदवालेतर्फे कपिल माळवीने 9 धावात 2, सुनील सक्रीने 13 धावात 2, संतोष भागण्णावरने 17 धावात 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे जिल्हा मुख्य न्यायाधीश मुस्तफा हुसेन सय्यद अजिज, कौटुंबिक न्यायालयाचे ए. व्ही. श्रीनिवेद, सुधीर सक्री, अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, विनय मांगलेकर, बारुदवाले, बसवराज जरळी, एस. एस. किवडसण्णावर, नितीन सोलन-पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बारुदवाले-मांगलेकर संघाला व उपविजेत्या प्रभू लायन्स या संघांना चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज शिवाजी पाटील, उत्कृष्ट गोलंदाज मंजुनाथ, अंतिम सामन्यातील सामनावीर व मालिकावीर सुनील सक्री यांना चषक देऊन गौरविण्यात आले.