Tarun Bharat

कॅसात्किनाला विजेतेपद

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

येथे झालेल्या महिलांच्या पहिल्या चॅम्पियननॅट्स बँक नॅशनल डी ग्रॅनबी टेनिस स्पर्धेत रशियाच्या दारिया कॅसात्किनाने जेतेपद पटकावले. तिचे हे दुसरे जेतेपद आहे.

अग्रमानांकन मिळालेल्या कॅसात्किनाने अंतिम लढतीत दारिया सेव्हिलेचा 6-4, 6-4 असा पराभव केला. दोन तास ही लढत रंगली होती. या मोसमातील तिचे हे एकेरीतील दुसरे जेतेपद आहे. याआधी तिने याच महिन्यात झालेल्या सॅन जोसमधील सिलिकॉन व्हॅली क्लासिक स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया कॅसात्किनाची अमेरिकन ओपन स्पर्धेत ब्रिटनच्या हॅरियट डार्टशी सलामीची लढत होणार आहे. 2017 मधील स्पर्धेत तिने शेवटच्या सोळा फेरीपर्यंत मजल मारली होती आणि हीच तिची यूएस ओपनमधील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

Related Stories

पार्थिव पटेल मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षण पथकात

Patil_p

भारत ‘अ’च्या पहिल्या डावात गायकवाडचे शतक

Amit Kulkarni

भारताचा विश्वविजेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का

Patil_p

दक्षिण आफ्रिका क्रिकेटपटूंच्या सरावाला प्रारंभ

Patil_p

एल्गार, बवुमा यांची अर्धशतके

Patil_p

19 डिसेंबरला आयओएची निवडणूक

Patil_p