Tarun Bharat

TMC उमेदवाराच्या समर्थनार्थ जया बच्चन मैदानात

ऑनलाईन टीम / कोलकाता : 

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडाका सुरू असून, तृणमूल काँग्रेसच्या समर्थनार्थ समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन मैदानात उतरणार आहेत. 

जया बच्चन रविवारी संध्याकाळी उशिरा कोलकात्यात दाखल झाल्या असून, आज टालीगंजमधील तृणमूलचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या रॅलीत त्या सहभागी होणार आहेत. अरुप विश्वास हे भाजप उमेदवार बाबूल सुप्रियो यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नंदीग्रामनंतर टालीगंजमधील ही सीट हॉट सीट मानली जात आहे. कारण या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तीन वेळा निवडून आले आहेत आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोही भाजपच्या तिकिटावर या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.

बाबूल सुप्रियो तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार झटका देऊ शकतात, कारण ते बंगालचे प्रसिद्ध गायक असून, या भागात त्यांचे वर्चस्व आहे.

Related Stories

‘विकास विरुद्ध विलंब’, मोदींचा नवा मंत्र

Patil_p

विरोधकांकडून दिशाभूल : सीतारामन

Patil_p

नाव रामाचे, चित्रही रामाचेच !

Patil_p

परंपरा तुटल्यास देव माफ करणार का?

Patil_p

महाराष्ट्रात मागील 24 तासात 511 पोलीस कोरोनाबाधित; 7 जणांचा मृत्यू

datta jadhav

मंत्रिपदासाठी १०० कोटींची मागणी, मुख्यसूत्रधार रियाज कोल्हापूरचा

Abhijeet Khandekar