ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडाका सुरू असून, तृणमूल काँग्रेसच्या समर्थनार्थ समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन मैदानात उतरणार आहेत.
जया बच्चन रविवारी संध्याकाळी उशिरा कोलकात्यात दाखल झाल्या असून, आज टालीगंजमधील तृणमूलचे उमेदवार अरुप विश्वास यांच्या रॅलीत त्या सहभागी होणार आहेत. अरुप विश्वास हे भाजप उमेदवार बाबूल सुप्रियो यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नंदीग्रामनंतर टालीगंजमधील ही सीट हॉट सीट मानली जात आहे. कारण या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार तीन वेळा निवडून आले आहेत आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोही भाजपच्या तिकिटावर या जागेवरून निवडणूक लढवत आहेत.
बाबूल सुप्रियो तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला जोरदार झटका देऊ शकतात, कारण ते बंगालचे प्रसिद्ध गायक असून, या भागात त्यांचे वर्चस्व आहे.