ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालच्या महालपारा येथील अरांडी-आई बूथ क्रमांक 263 येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपच्या गुंडांनी टीएमसी उमेदवार सुजाता मंडल यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात मंडल यांच्या सुरक्षा अधिकाऱ्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. हल्ल्यावेळी बुथवर उपस्थित असलेले सीआरपीएफचे जवान केवळ बघ्याची भूमिका घेत होते, असा आरोप करत टीएमसी नेते डेरेक ओ ब्रायन यांनी हल्ल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
तर भाजपचे कार्यकर्ते विनाकारण मतदान केंद्रांवर TMC नेत्यांवर हल्ला करत आहेत. सुजाता मंडल यांचाही आरामबाग येथून भाजप कार्यकर्त्यांनी पाठलाग करून मतदान केंद्राजवळ त्यांच्यावर हल्ला केला, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.