टोप /वार्ताहर
राज्यात व जिल्हात जनावरांच्यात लंम्पी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.या आजाराचे समुळ उच्चाटन करण्यासाठी कोल्हापुर जिल्हात गोकुळ ने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.कोल्हापुर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतिने लंम्पी त्वचा रोग लसीकरण मोहीमेची सुरवात टोप येथील कल्लेश्र्वर व महालक्ष्मी दुध संस्थेत गोकुळचे चेअरमन विश्र्वास पाटील,संघाचे संचालक युवराज पाटील, रणजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी गोकुळचे चेअरमन विश्र्वास पाटील म्हणाले जिल्हात नऊ लाख पशुधन असुन या पशुधनाचे लंम्पी स्किन आजारापासुन सरंक्षण करण्यासाठी गोकुळने लसीकरण हाती घेतला आहे.शेतकरी बंधुनी न घाबरता लक्षण आढळताच गोकुळच्या पशुवैद्यकीय सेवेचा लाभ घेवुन पशुधन सरंक्षित करावे.असे अवाहन पाटील यांनी केले
यावेळी संस्थेचे चेअरमन बाबासो पाटील व्हाय चेअरमन सुनिल काटकर,डि.एस.पाटील,शहाजी पाटील,निवास पाटील, दिलीप पाटील,भिकाजी मुळीक,कुंडलिक पाटील,संदीप मुळीक, संभाजी मिरजकर तसेच गोकुळचे पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक उदय मोगले,प्रकाश दळवी यांच्या सह सर्व दूध उत्पादक पशुपालक उपस्थित होते.