तरुण भारत

चिमुरडीला वाचविण्यासाठी चढला 8 व्या मजल्यावर

वाचविल्यावर गुपचूप निघून कामावर गेला

3 वर्षीय मुलीला वाचविण्यासाठी एका व्यक्तीने दाखविलेला शूरपणा पाहून लोक त्याला नायक ठरवत आहेत. कजाकिस्तानचा रहिवासी असलेल्या 37 वर्षीय व्यक्तीने कामावर जाताना एका मुलीला 8 व्या मजल्यावर लटकताना पाहिले आहे. तेथे आणखीन लोक जमा झाले होते, तरीही कुणी मुलीला वाचविण्यास वर चढत नव्हता. अशा स्थितीत कुणाच्या मदतीशिवाय खिडकीवर लटकलेल्या 80 फुटांवरील मुलीला त्याने सुरक्षित उतरविले आहे.

Advertisements

मित्रासोबत जात होता कामावर

सबित शोंतकबाएव दररोजप्रमाणे स्वतःच्या मित्रासोबत कामावर जात होता. तेव्हा त्याला एकेठिकाणी एका इमारतीखाली गर्दी दिसून आली. त्या इमारतीच्या 8 व्या मजल्याच्या खिडकीवर एक छोटी मुलगी लटकलेली होती. अशा स्थितीत सबितने तिला वाचविण्याचा निर्णय घेतला आणि कुठल्याही सुरक्षा उपकरणाशिवाय खिडकीला लटकलेल्या स्थितीत असलेल्या मुलीला सुरक्षित खाली उतरविले आहे.

आई शॉपिंग, घरात एकटी मुलगी

तीन वर्षीय मुलीची आई तिला घरात एकटी सोडून शॉपिंग करण्यासाठी गेली होती. मुलगी खेळत असताना खिडकीत लटकली होती. उशी आणि स्वतःच्या खेळण्यांवर चढत ती खिडकीवर चढली होती. खेळता-खेळता ती खिडकीवर लटकली होती. ही खिडकी जमिनीपासून 80 फूट उंचीवर होती.

बचावानंतर थेट कामावर

सबित मुलीला वाचविल्यावर कुणालाच न भेटता थेट कामावर गेला होता. मुलीची आई शॉपिंगमधून परतण्याची प्रतीक्षा त्याने केली आहे. सबितला आता कजाकिस्तान सरकारकडून पदकाने गौरविण्यात आले आहे. काही मोठे काम केल्याचे मला वाटत नसल्याचे सबित म्हणाला.

Related Stories

त्सुनामीनंतर टोंगा देशाला मदतीचा ओघ सुरू

Patil_p

चीनविरोधात अमेरिकेकडे काही पुरावे

Patil_p

…प्रसंगी सीपॅक रद्द करू

Patil_p

बुकरच्या शर्यतीत 13 साहित्यिक

Patil_p

ट्रम्प यांचा नवा कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म

Patil_p

काश्मीर भारताचा अंतर्गत विषय!

Patil_p
error: Content is protected !!