मालवण -:
अनधिकृत पर्ससीन मासेमारी नौकांवर कारवाईसाठी येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयासमोर पारंपरिक मच्छीमारांचे बेमुदत उपोषण आंदोलन गुरूवारी सुरू झाले. अनधिकृत पर्ससीन नौका रोखण्यासाठी आता मत्स्य आयुक्तांनीच मालवणला यावे अशी पारंपरिक मच्छीमारांची मागणी आहे.