सांखळी/प्रतिनिधी
मतदारसंघातिल कुडणे गावातील श्री कुडणेश्वर, महालक्ष्मी देवस्थानचा वार्षिक होमकुंड जत्रोत्सव आज गुरुवार दि 21 रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमा निशी साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त मंदिरात सकाळपासून धार्मिक विधी.सकाळी 6 वा.श्रीच्या मूर्तीस अभिषेक तदनंतर दु 4 वा.नवीनधोंड गणना मानण्याचा कार्यक्रम होईल.सध्या.5 वा. श्री देवी सातेरीला बाल धोंड गण समवेत ओटी चा मान अर्पण करण्यात येईल. 6 वा.श्री देवी सातेरी मंदिरा जवळील तळीवर आंघोळ करून आगमन होईल.या ठिकाणी सुहासिनी तर्फे देवींची ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल.रात्री 11 वा.हरवळे येथून श्री देव रुदेश्वर देवस्थन कडून येणारी ओटी, फुले, फळांची भेट स्वीकारण्यात येईल.रात्री 1 वा.गावातील प्रत्येक वाडय़ावरून धोंड गण ढोल तास्यांच्या गजरात मंदीरात प्रवेश करतील.नंतर देवीला प्रांगणात नाचवण्यात येईल.पहाटे 2 वा. होमकुंडास अग्नि देऊन प्रजोलीतकरण्यात येणार आहे. त्या नंतर देव रवळनाथ मंदिरात सर्व धोंड गण कृपा प्रसाद घेतल्यावर होमकुंड च्या पेडत्या निखाऱया वरून प्रवेश करणार आहे.पहाटे5वा.देवीचा होमकुंडातुन प्रवेश करणार आहे. मंदिराच्या मंडपात भक्तांना आशीर्वाद दिला जाईल. शुक्रवारी रात्री10 वाजता फळा फ़ुलांची पावणी होईल.तदनंतर श्री साई कला मंडळ सांगोरडा तर्फे वसंत कानेटकर लिखित व अविनाश पुरखे दिग्दर्शनकेलेला ” इथे ओशाळला मृत्यू” नाटकाचा प्रयोग सादर होईल.शनिवारी23 रोजी रात्री 10 वा.पावणी, तदनंतर यश प्रभा पणजी तर्फे वसंत कानेटकर लिखित व पुरुषोत्तम पै दिग्दर्शन” संगीत मत्स्य गंधा” नाटक सादर होईल. रविवारी 24 रोजी रात्री 10 वा.आमोणा युथ तर्फे “शुभमंगल सावधान ” नाटक सादर होईल.