प्रतिनिधी /पेडणे
उगवे येथील माऊली मंदिरातील वार्षिक भागवत सप्ताह आज शनिवार दि. 3 सप्टेंबर पासून प्रारंभ होत असून पुरोहित शाम वझे यांच्या पौरोहिताखाली विविध धार्मिक कार्यक्रमाने हा सप्ताह सुरुवात होईल. या धार्मिक सप्ताह निमित्त मंदिरात अखंड नामसंकीर्तन तसेच रोज रात्री गायन, नामवंत भजनी कलाकारांचे भजन होणार आहे.
अखंड चालणाऱया या संगीत महोत्सवाची सांगता शनिवार दि. 10 रोजी भाऊ नाईक वेतोरा यांचे कीर्तन व दुपारी गोपाळकाला आरती आणि तीर्थप्रसादाने होईल. त्यानंतर मंदिरात वार्षिक पावणी पुकारण्याचा कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी तसेच ग्रामस्था?नी या सोहळय़ाला उपस्थित राहावे असे आवाहव विनायक महाले यांनी केले आहे.