ऑनलाईन टीम/तरुण भारत
पार्लमेंटमध्ये जेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी बोलायची संधी मिळाली त्यावेळी शाहू महाराजांची भूमिका काय होती? हे पार्लमेंटमध्ये सांगितली तेव्हा सर्व खासदारांनी कौतुक केलं. तसेच जिल्ह्यात जो कृतज्ञता सोहळा सुरु आहे. यानिमित्ताने वर्षभरात शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, याची सर्वाना कल्पना आहे. हे जगभर कसं पोहचवता येईल याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे, तो मी करणार आहे. तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकार जे काही काम करत आहे, ते केंद्राने देखील करावे असे वक्तव्य माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते शाहू मिल येथे सुर्वण शताब्दी कार्यक्रमात बोलत होते.
शाहू महाराजांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगला उपक्रम हाती घेतला आहे. वर्षभर मी ही शाहू महाराजांना अभिवादन करावे यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. तसेच शाहू महाराजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्य सरकार जे काम करत आहे, ते केंद्राचे देखील आहे. शाहूमिल स्मारक व्हावे यासाठी राज्य सरकार प्रमाणे केंद्राने देखील यासाठी निधी द्यावा, शाहू महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर ते देशाचे देखील आहेत, असे मत यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले.