Tarun Bharat

राज्यात भोंग्यावरून खूप काही सुरू आहे, पण विकासाचा भोंगा शाहूमिल मध्ये वाजला

पालकमंत्री सतेज पाटील यांचे वक्तव्य

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी महाराष्ट्राला समतेची भूमिका दिली. त्यांनी आपल्या दूरदृष्टिकोनातून विकासबद्द केलेल्या योगदानामुळे महाराष्ट्र सर्व क्षेत्रात समृद्ध आहे. कोल्हापुरात कृतज्ञाता पर्व साजरे करत असताना वर्षभरात अनेक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. याचबरोबर राज्यातील प्रत्येक ठिकाणी हा उपक्रम राबवणर आहे. तसेच राज्यात भोंग्यावरून खूप काही सुरू आहे. पण विकासाचा भोंगा शाहूमिल मध्ये वाजला असे वक्तव्य पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. ते शाहू मिल येथे सुर्वण शताब्दी कार्यक्रमात बोलत होते.

दूरदृष्टी असलेल्या लोकराजाने संपूर्ण महाराष्ट्राला समतेची भूमिका दिली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे यंदा स्मृती शताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकराजा कृतज्ञता पर्वाचे आयोजन केले आहे. कृतज्ञतेचे पर्व साजरे करत असताना जिल्ह्यात वर्षभर अनेक कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व ठिकाणीही हा उपक्रम राबवणार आहे, असे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, शाहू महाराजांच्या समतेचे शिक्षण सर्वांपर्यंत पोहचविणे हे आमचं काम आहे. राज्य सरकार हे राजर्षी शाहूंच्या विचाराने चालणारे सरकार आहे. त्यामळे हे सरकार शाहूंच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाईल असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी पाटील यांनी राज्यात भोंग्या वरून सुरु असणाऱ्या वादावर भाष्य करत भाजपला कोपरखळी लगावली. राज्यात भोंग्यावरून खूप काही सुरू आहे. पण विकासाचा भोंगा शाहूमिल मध्ये वाजला असा टोला यावेळी पाटील यांनी लगावला.

शाहूमिल हे स्मारक होण्यासाठी आणि त्या कमला गती देण्यासाठी आराखडा सादर केला आहे. लवकरच याच्या कामाला सुरुवात होईल. लोकांना जे अपेक्षित आहे,त्या सर्व गोष्टी अंतर्भूत केल्या जातील, तसेच सरकारकडून या शाहूमिलला निधी मिळेल याची ग्वाही मी देतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.

तर जिल्ह्यात लाखो लोक लोकराजाला अभिवादन करण्यासाठी १०० सेकंद उभे राहिले. राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक १०० सेकंद उभा राहिला आणि राजाला माझ्या करवीर वासीयांनी अभिवादन केलं, असेही त्यावेळी म्हणाले.

Related Stories

जि. प. आरोग्यचे लेखा व्यवस्थापक सेवामुक्त

Abhijeet Shinde

भंवरी हत्याकांडातील आरोपी, माजी मंत्री महिपाल मदेरना यांचे निधन

datta jadhav

शाहू विचार जागर यात्रेचे साताऱ्यात स्वागत; ज्येष्ठ विचारवंत आ.ह.साळुंखे यांनी दिल्या शुभेच्छा

Abhijeet Khandekar

चंदुरात आज नव्याने आठ पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण रुग्ण 44 वर

Abhijeet Shinde

नांदणी येथे अंगणवाडी सेविकांचा चकोते ग्रुप कडून यथोचित सन्मान

Abhijeet Shinde

डोक्यात दगड घालून निर्घृण खून; कोल्हापुरातील घटना

Archana Banage
error: Content is protected !!