प्रतिनिधी/ वास्को
सम्राट क्लब वास्कोतर्फे आज रविवार दि. 8 रोजी सायंकाळी 3.30 वा. बायणा वास्को येथील रवींद्र भवनच्या सभागृहात सम्राट संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संगीत महोत्सवाचे उद्घाटन आमदार संकल्प आमोणकर यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी सम्राट क्लब वास्कोचे अध्यक्ष जयराम पेडणेकर उपस्थित असतील.
या संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्रात शिवम पालयेकर, नवाब शेख, सिद्धी होळकर यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱया सत्रात अशोक मांद्रेकर, गौरी महाले, दिप्ती चोडणकर यांना सादर करतील. तिसरय़ा सत्रात पारंपरिक भजन सादर केले जाणार आहे. या कार्यक्रमात गायक वासुदेव च्यारी, अशोक मांद्रेकर, संदेश नेरूरकर, अरूण महाबळ यांचा समावेश असेल.
महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात शास्त्रीय गायक कलाकार लवू नाईक, पुजा नाईक मांद्रेकर यांचा गायनाचा कार्यक्रम होईल. गायक कलाकारांना यावेळी तबल्यावर शेखर मांद्रेकर, हार्मोनियमवर महेंद्र पार्सेकर तर पखवाजवर तेजस तोरस्कर व संदेश नेरूरकर साथसंगत करतील. निवेदकाची जबाबदारी ज्योती भूषण जोशी सांभाळतील.
संगीत रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहावे असे आवाहन सम्राट क्लब वास्कोतर्फे करण्यात आले आहे.