रायबाग : कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो भाविक चिंचली (ता.रायबाग) येथील मायाक्का देवीच्या यात्रेसाठी दाखल झाले आहेत. आज गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असून महानैवेद्य व पालखी सोहळा होणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून यात्रेसाठी मायाका चिंचलीत भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी यात्रेचा मुख्य दिवस असताना बेळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा व कोकण आधी भागातून मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी दाखल झाले आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे यात्रेला परवानगी नव्हती. मात्र यावर्षी कोरोनाचे निर्बंध नसल्यामुळे यात्रेला प्रचंड गर्दी झाली आहे. भाविकांची गर्दी वाढणार असल्याने खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.