सरकारी, खाजगी, राजकीय पातळीवर कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयातील विविध सरकारी, खाजगी संस्थांमध्ये व राजकीय पातळीवर आज 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग †िदवस योगासने करून साजरा करण्यात येणार आहे. यासाठी सत्तरीत वेगवेगळय़ा ठिकाणी योगवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5 वाजल्यापासून योगासने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून मिळाली आहे.
सत्तरीतील सरकारी आस्थापने, प्राथमिक, माध्यमिक सरकारी व खाजगी शाळा, पतंजली योग समितीतफ्xढ विविध ठिकाणी योग वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे पाच वाजल्यापासून ओम सूर्याय नमः मंत्र म्हणून योगासने करण्यात sयेणार आहेत. यात तालुक्यातील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
निरोगी व सदृढ शरीरासाठी योग महत्त्वाचा आहे. रोज नियमित योग केल्यामुळे आपले शरीर तंदुरूस्त व निरोगी बनते. सकाळी उठल्याबरोबर योग केल्यास शरीरात नवचैतन्य निर्माण होते. यामुळे योगासने करण्यास लहानापासून थोरांपर्यंत अनेकजण सहभागी होताना दिसतात. तालुक्मयातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे विद्यार्थी देखील या योगदिन उपक्रमात सहभागी होणार आहेत.
सत्तरीत दिवसभर वेगवेगळय़ा भागामध्ये योग वर्गाचे आयोजन केले आहे. सकाळी पाच वाजल्यापासून योगाला सुरुवात होणार आहे. पतंजली योग समितीचे पदाधिकारी व सदस्या योगदिन कार्यक्रमात भाग घेणार असून यासाठी तयारी पूर्ण झाली असून वाळपई शहरामध्ये पहाटे पाच वाजल्यापासून योगासनांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच सत्तरीत अनेक योग्य शिक्षक तयार झाले आहेत. हे शिक्षक आपापल्या भागात योग दिन साजरा करणार आहेत, अशी माहिती योग शिक्षक प्रदीप गवंडळकर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार सरकारतर्फे योग दिन साजरा करण्यात येणार आहे. तसेच भारतीय जनता पक्षातर्फे राजकीय स्तरावर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. सत्तरीतील वाळपई व पर्ये मतदार संघातील भाजपा मंडळातर्फे योग वर्गाचे आयोजन केले आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात महिला व पुरूष कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.