प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विविध भागात हेस्कॉमकडून दुरूस्ती केली जाणार असल्याने सोमवार दि. 12 रोजी वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरासह कॅम्प व शहापूरच्या काही भागात वीजपुरवठा ठप्प राहणार आहे.
मराठा कॉलनी, मारूती कॉलनी, एस. व्ही. कॉलनी, काँग्रेस रोड, नेहरू रोड, सावरकर रोड, रॉय रोड,
व्हॅक्सिन डेपो, रानडे रोड, आगरकर रोड, हिंदू नगर, राणाप्रताप रोड, रवींद्रनाथ टागोर रोड, इंद्रप्रस्थ नगर, गुडशेड रोड, केएचबी. कॉलनी, एम. जी कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड, शिवाजी रोड, रेडिओ कॉम्प्लेक्स, पाटील गल्ली, टिळक चौक, देशपांडे गल्ली, बसवाण गल्ली, गोवावेस, केळकर बाग, समादेवी गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, बापट गल्ली, बुरूड गल्ली, गणपत गल्ली, मिलिटरी एरिया, आरए लाईन, कॅम्प, विनायक रोड, लक्ष्मी टेकडी, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, मारूती गल्ली, नानावाडी, आश्रय वाडी, न्यू गुडशेड रोड, एसपीएम रोड, कपिलेश्वर रोड, महात्मा फुले रोड, हुलबत्ते कॉलनी, खडेबाजार शहापूर, कपिलेश्वर कॉलनी, कोरेगल्ली, मिरापूर गल्ली, गोवावेस, एसपीएम रोड, सराफ कट्टा या परिसरात वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.