24-04-2022 ते 30-4-2022
मेष
आयत्या वेळी कोणावर तरी विश्वास ठेवावा आणि त्याच व्यक्तीने दगा द्यावा अशी साधारण परिस्थिती या आठवडय़ामध्ये असेल. मित्रसंबंधांमध्ये एखाद्या मित्राची आवाजवी अपेक्षा तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. आर्थिक बाबतीत घेतलेले निर्णय योग्य ठरतील. नातेसंबंधात गोडवा निर्माण करण्याकडे कल असेल.
केळीच्या झाडा खालची माती जवळ ठेवावी
वृषभ
आजुबाजूची परिस्थिती आणि जवळच्या माणसांचा बदललेला स्वर हा तुमच्या चिंतेचा विषय असेल. हा आठवडा संमिश्र प्रकारचे फळ देईल. आर्थिक आणि व्यावसायिकदृष्टय़ा आठवडा चांगला जाईल, पण नातेसंबंधांमध्ये तणाव येण्याची शक्मयता आहे.
गरजू विद्यार्थ्यांना वस्त्र दान करावे.
मिथुन
कामाचा व्याप सांभाळताना आपल्या सहकाऱयांबरोबरचा आपला व्यवहार योग्य असावा याची काळजी घ्या. शारीरिक थकवा आणि मानसिक ताण या आठवडय़ात अनुभवायला येईल. आर्थिक नियोजन विस्कटण्याची शक्मयता आहे. प्रेमसंबंधात विश्वासाला महत्त्व द्या.
सात लवंगा जवळ ठेवाव्यात.
कर्क
या आठवडय़ात तब्येतीला सांभाळावे लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीच्या बाबतीत समोरची व्यक्ती तुमचा फायदा उचलू शकते. या आठवडय़ात भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कोणावरही आंधळा विश्वास घातक ठरू शकतो.
पिंपळाचे फाटलेले पान जवळ ठेवावे.
सिंह
या आठवडय़ात तुमचा कल थोडासा अध्यात्माकडे झुकलेला असेल. याचे कारण कदाचित एखाद्या जवळच्या व्यक्तीशी आलेला दुरावा असू शकते. या आठवडय़ात तुम्ही स्वमग्न असाल. आर्थिकबाबतीत येणे कमी आणि देणे जास्त अशी परिस्थिती होऊ शकते.
कष्टकऱयांना दूध दान करावे
कन्या
परिवारासोबत वेळ घालवल्यामुळे मन आनंदी असेल. जवळच्या एखाद्या ठिकाणाला भेट द्याल. धार्मिक कार्यात रस घ्याल. जुनी एखादी चिंता तुम्हाला सतावू शकते. परिवारातील व्यक्तींची मने सांभाळावी लागतील. जास्त दमछाक होऊ देऊ नका. लहान मुलीला हिरवे वस्त्र दान करावे
तूळ
कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखवलेला उत्साह आणि केलेले नियोजन याचे वरि÷ांकडून कौतुक होऊ शकते. व्यवसायाच्या माध्यमातून नवीन ओळखी होतील. वैवाहिक जीवनामध्ये निर्माण झालेला तणाव कमी होऊ लागेल. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा मानस असेल.
लाजाळूची पाने जवळ ठेवावी.
वृश्चिक
तुम्ही विचार केलेल्या कामाचा किंवा कल्पनेचा फायदा तिसराच कोणीतरी उचलण्याची दाट शक्मयता आहे. त्यामुळे आपल्या योजना गुप्त ठेवाव्यात. परिवारातील ज्ये÷ व्यक्तीच्या तब्येतीची काळजी वाटू शकते. वैवाहिक जीवन सुखमय असेल. प्रेमींनी लांब फिरायला जाणे टाळावे.
मुंग्यांना साखर घालावी.
धनु
कामाच्या व्यापामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते. कामाच्या ठिकाणी वरि÷ांचा त्रास संभवतो. दुसऱयांना केलेल्या मदतीचा परतावा तुम्हाला मिळणार नाही. वैवाहिक जीवनामध्ये अनावश्यक टोमणे मारणे टाळावे. महिलांनी आपल्या तब्येतीची खास काळजी घ्यावी. गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट द्यावी.
मकर
मनाप्रमाणे कामे न झाल्यामुळे मन उदास होऊ शकते. धार्मिक समारंभात भाग घ्याल. ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला कामी येईल. मित्र परिवारासोबत एखादी सहल प्लॅन कराल. आर्थिक आवक सर्वसामान्य असेल. पारिवारिक नात्यांमध्ये गुंता होण्याची शक्मयता आहे. लहान मुलांना खव्याची मिठाई वाटावी.
कुंभ
पुष्कळ कष्ट घेऊनही कामे होणे अवघड आहे असे वाटेल पण त्याचबरोबर अपेक्षित नसलेली कामे पूर्ण झाल्यामुळे आनंदाचा धक्का बसेल. जवळच्या मित्राच्या मदतीमुळे छोटय़ा-मोठय़ा अवघड प्रसंगातून तरून जाल. या आठवडय़ात तुम्हाला कृतज्ञता दाखवण्याच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या कामाला जाताना तुळशीचे पान जवळ ठेवावे
मीन
गेल्या काही दिवसांपासून घरात आणि कामाच्या ठिकाणी असलेला विसंवाद निवळू लागेल. या आठवडय़ात काही वेळ तुम्हाला तणावमुक्त रहावे असे वाटेल. एखाद्या सुट्टीची किंवा एखाद्या ब्रेकची गरज आहे हेही तुम्हाला जाणवेल. आर्थिक आवक थोडी कमी असली तरी समाधानाचे क्षण मिळतील.
अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालावीत.
टॅरो उपाय ः
कामाच्या ठिकाणी 12 अभिमंत्रित गोमती चपे लाल कपडय़ात बांधून ठेवावीत, आर्थिक उन्नती होते.