वृत्तसंस्था/ दुबई
संयुक्त अरब अमिरातमध्ये 13 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणाऱया पहिल्या इंटरनॅशनल लिग टी-20 स्पर्धेसाठी सायमंड टॉफेल, रॉड टकर आणि रिचर्ड किटलबॉरो यांचा पंच पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये आंद्रे रसेल, रॉबीन उत्थप्पा, ऍलेक्स हॅलेस, हेटमेयर, बोल्ट, स्टोनिस यांचा सहभाग राहिल.
या स्पर्धेसाठी जागतिक दर्जाच्या क्रिकेट पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे. सायंमड टॉफेल यांनी आपल्या पंचगिरीच्या कारकिर्दीत पाचवेळा आयसीसीचे सर्वोत्तम पंच पुरस्कार मिळवला आहे. सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबी तसेच दुबई आणि शारजाह या शहरामध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी अकबर अली खान, व्हेर्फ, लिसेली रिफेर, सॅगेस, शिजू मनिल, रोशन महानामा यांच्यावरही पंचगिरीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेत एकूण 34 सामने खेळवले जाणार आहेत.