Tarun Bharat

भाजपविरोधी उमेदवाराला तोगडियांचा पाठिंबा

गुजरात निवडणुकीत वराछा मतदारसंघात सर्वाधिक चुरस दिसून येत आहे. या मतदारसंघात आप अन् भाजप यांच्यातच खरी लढत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी सूरतमध्ये जाहीरसभा अन् रोड शो केला होता. आता सूरतच्या मैदानात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांची एंट्री झाली आहे. भाजप उमेदवार अन् माजी मंत्री किशोर कनाणी यांना आव्हान देत असलेले  आप उमेदवार अल्पेश कथीरिया यांनी  तोगडियांची भेट घेतली आहे. हिंदूहृदयसम्राट डॉ. प्रवीण तोगडिया यांची भेट झाली. तोगडिया यांनी विजयी भव असा आशीर्वाद दिल्याचे कथीरिया यांनी ट्विट करत म्हटले आहे.

तोगडिया यांच्या भेटीप्रसंगी कथीरिया यांनी ‘हिंदू ही आगे’ असा संदेश असलेले वस्त्र परिधान केले होते. कधीकाळी नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय राहिलेले तोगडिया आता संघ परिवारात सक्रीय नाहीत. तोगडिया आता भाजपचे विरोधक मानले जातात.

2008 च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आलेल्या वराछा रोड मतदारसंघावर सध्या भाजपचा कब्जा आहे. भाजप उमेदवार किशोर कनाणी यांनी 2012 आणि 2017 च्या निवडणुकीत या मतदारसंघात विजय मिळविला होता. दोन्हीवेळा कनाणी यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार धीरुभाई गजेरा यांचे आव्हान होते. यावेळी काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमदेवारी दिली आहे. तर आम आदमी पक्षाने पाटीदार आंदोलनात मोठा चेहरा ठरलेले अल्पेश कथीरिया यांना मैदानात उतरवून चुरस वाढविली आहे.

सूरतमधील हा मतदारसंघ पूर्णपणे शहरी आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये सूरत महापालिका निवडणुकीत आपने 27 जागा जिंकल्या होत्या. यातील बऱयाच जागा याच मतदारसंघातील होत्या. या पार्श्वभूमीवर पालिका निवडणुकीची पुनरावृत्ती या मतदारसंघात करण्याचा आम आदमी पक्षाचा प्रयत्न आहे. तर भाजपसमोर स्वतःचा बालेकिल्ला वाचविण्याचे आव्हान आहे.

वराछा रोड मतदारसंघासह सूरतमध्ये किशोर कनाणी हे किशोर काका या नावाने ओळखले जातात. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तर अल्पेश कथीरिया हे मूळचे सौराष्ट्रातील असले तरीही वराछामध्ये त्यांचा चांगला प्रभाव आहे.

Related Stories

शेतीला निसर्गाच्या प्रयोगशाळेशी जोडावे लागणार

Amit Kulkarni

पराभवाच्या भीतीनेच ममतांकडून शोधाशोध

Patil_p

मोटेरा स्टेडिअमवरील ट्रम्प यांच्या स्वागताची कमान कोसळली

tarunbharat

ड्रायव्हिंग टेस्टशिवाय मिळणार परवाना

Patil_p

वृक्षासोबत युवती विवाहबद्ध

Patil_p

व्हॉट्सऍप विरोधातील याचिकेवर केंद्राला नोटीस

Patil_p