ओनलाईन/टीम
वेटलिफ्टिंगमधील मीराबाई चानूच्या रौप्यानंतर चाहते दुसर्या पदकाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु अद्याप ही प्रतीक्षा संपलेली नाही. ऑलिम्पिकमधील आज भारताचा सहावा दिवस आहे. अजूनही दुसऱ्या पदकाची कमाई झालेली नाही. रायफल शूटिंगमध्ये भारताला पदकाची अपेक्षा होती, परंतु आतापर्यंत भारचाच्या नशिबी निराशाच आली आहे. आज झालेल्या तिरंदाजीमध्ये दीपिका कुमारीने सलग दुसरा विजय मिळविला आहे.
धर्मयुण, भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने तिरंदाजी स्पर्धेमध्ये सलग दुसरा उत्कृष्ट विजय मिळवत पुढची फेरी गाठली आहे. तिने अंतिम 8 मध्ये जागा मिळवली आहे.
बॉक्सिंगमध्ये पूजा राणीचा विजय
पूजा राणीने ऑलिम्पिकमधील सलामीचा सामना 5-0 ने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश मिळवला आहे. पूजाने तिच्या अनुभवाचा उपयोग करत इचार्क आणि सामन्यावर नियंत्रण राखले. या सामन्यात पूजाने संयम दाखवत नवख्या इचार्कला गुण मिळवण्याची संधी दिली नाही. पूजा पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे.