Tarun Bharat

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Advertisements


टोकियो \ ऑनलाईन टीम

टोकियो येथे २३ ऑगस्टपासून पॅरालीम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताकडून या स्पर्धेत ९ क्रीडाप्रकारात ५४ खेळाडू पाठवण्यात आले आहे. भारतीय संघाच्या स्पर्धेतील सुरुवात २५ ऑगस्ट रोजी टेबल टेनिस स्पर्धेपासून झाली आहे.पण सलामीच्या सामन्यातच भारताच्या टेबल टेनिसपटू सोनलबेन मनुभाई पटेल आणि भाविनाबेन पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला.

भारतीय टेबल टेनिसपटू सोनल पटेलचा सामना महिला एकेरी वर्ग ३ गट ‘ड’ चा सामना चायनाच्या ली कियान सोबत झाला. लीने सोनलचा ११-९, ३-११, १७-१५, ७-११, ४-११ अशा सेटमध्ये २-३ ने पराभव केला. वर्ग ३ श्रेणीमध्ये, खेळाडूंवर ट्रंकचे नियंत्रण नसते, तरीही त्यांचे हात कमीत कमी दुर्बलतेमुळे प्रभावित होतात. वर्ग ४ श्रेणीमध्ये अ गटात भविना पटेल यांनी टेबल टेनिस स्पर्धेत भारतचे प्रतिनिधित्व केला. भविनाचा सामना चायनाच्या झो यिंग विरुद्ध झाला.झो हीने ३-११, ९-११, २-११ ने सरळ सेट जिंकत भविनाला पराभूत केले. या सामन्यात भविनाला झो विरुद्ध एकही सेट जिंकता आला नाही. पॅरालीम्पिक स्पर्धेत भारताची सुरुवात जरी पराभवाने झाली तरी स्पर्धेतील पुढील सामन्यात भारताच्या पदरात पदकाची भर पडेल अशी आशा आहे. नुकत्याच पार पडलेल्या टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सात पदके पटकावली आहेत.

Related Stories

फुटबॉल संघांच्या शिबिरासाठी गोव्याची निवड

Patil_p

विम्बल्डनसाठी व्हीनस, अँडी मरेला वाईल्डकार्ड प्रवेश

Patil_p

अमेरिकेत ‘फायझर-बायोएनटेक’ लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

datta jadhav

हिमाचलप्रदेशात बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

Tousif Mujawar

53 वर्षांनी लहान असणाऱया युवतीशी विवाह

Patil_p

गद्दारांचं सरकार कोसळणार, राज्यात पुन्हा निवडणूक लागणार; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

Archana Banage
error: Content is protected !!