- अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय
ऑनलाईन टीम / टोक्यो :
टोक्यो ऑलिम्पकिमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर आता टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत देखील भारताचे पॅरा एथलिट्स आपला झेंडा फडकावत आहेत. टेबल टेनिसपटू भाविना पटेल हीने सलग तीन सामने जिंकत सेमी फायनलमध्ये आपली जागा मिळवली आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू आहे.
भाविनाने क्लास 4 राऊंडमध्ये सर्बियाच्या बोरिस्लावा पेरिच रांकोविच हीला 3-0 ने मात देत सामना जिंकला. आता भाविना अंतिम 4 मध्ये पोहोचली असून पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. तिने हा सामना 11-5, 11-6 आणि 11-7 अशा सरळ तीन सेट्समध्ये जिंकत आपल्या नावे केला आहे. भाविनाने केवळ 17 मिनिटांमध्ये हा सामना आपल्या नावावर केला आहे. बाविनाने पहिला गेम केवळ 5 मिनिटांमध्ये तर दुसरा आणि तिसरा गेम प्रत्येकी सहा – सहा मिनिटांमध्ये जिंकला. भाविनाच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.