Tarun Bharat

#TokyoOlympics: पी.व्ही. सिंधूकडून हाँगकाँगच्या चेंग गँनचा पराभव करत नॉकआऊट’मध्ये प्रवेश

नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम

टोक्यो ओलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने आणखी एक विजय मिळवला आहे. सिंधूने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला सरळ सेट्समध्ये नमवत हा विजय मिळवला असून सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासोबतच तिने नॉकआउट फेरीत प्रवेश केला.

पी.व्ही. सिंधूने पहिला सेटमध्ये २१-९ अशा फरकाने आघाडी घेतली. १५ मिनिटं चाललेल्या पहिल्या सेटमध्ये हाँगकाँगच्या गँन यीकडून चुका झाल्या. याचा सिंधूने पुरेपूर फायदा घेत पहिल्याच सेटमध्ये सामना आपल्या बाजूनं फिरवला. दरम्यान, दुसऱ्या सेटमध्ये हाँगकाँगच्या चेंन गँन यीने वापसी केली. त्यामुळे पी.व्ही. सिंधूला तगडी फाईट द्यावी लागली.

दुसऱ्या सेटमध्ये एका क्षणी दोन्ही खेळाडू १४-१४ अशा बरोबरीत होत्या. त्याचवेळी सिंधूने चांगला खेळ करत दुसऱ्या सेटमध्येही आघाडी घेतली. सिंधूने दुसरा सेट २१-१६ अशा फरकाने आपल्या नावे केला. एकूण ३५ मिनिटं चाललेला हा सामना सिंधूने २१-९, २१-१६ अशा फरकाने जिंकला. महिला एकेरीच्या ग्रुप स्टेज सामन्यात सलग दुसरा विजय मिळवत सिंधूने नॉकआउट फेरीत प्रवेश केला आहे.

या विजयासोबतच सिंधूने नॉकआउट फेरीत प्रवेश केला. जगातील सातव्या क्रमांकाची खेळाडू सिंधू आता पुढील सामन्यात डेन्मार्कच्या मिआ ब्लीचफेल्डटसोबत लढणार आहे. ग्रुप-I मधून आलेली मिआसोबत सिंधूचा रेकॉर्ड चांगला असून मिआला केवळ एकदाच सिंधूवर विजय मिळवता आला आहे. यंदाच्या वर्षी दोघीही एकमेंकीविरुद्ध दोन सामने खेळल्या असून एका सामन्यात सिंधू तर एका सामान्यात मिआ जिंकली आहे.

Related Stories

विट्याच्या पृथ्वीला पदार्पणातच इंटरनॅशनल गोल्ड

Archana Banage

राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. प्राची पवार यांच्यावर टोळक्याकडून जीवघेणा हल्ला

datta jadhav

शेत एक, धान्ये दहा हजार

Patil_p

”मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे अजूनही मार्ग खुला”

Archana Banage

ग्राहकांना वारंवार विनंती करीत राहणार

Amit Kulkarni

व्हॅलेन्सियाच्या प्रशिक्षकाची हकालपट्टी

Patil_p