प्रतिनिधी / रत्नागिरी :
अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, कोकण विभाग-शाखा तालुका रत्नागिरी या शाखेच्या पहिल्या वर्धापन दिन कार्यक्रमात भेदक शाहिरी आणि जाखडी नृत्यांच्या मनोरंजक कार्यक्रमांनी समस्त रसिकजन मंत्रमुग्ध झाले.
हा कार्यक्रम कोकण विभागिय अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य ऋतुजा जाधव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सभापती मेघना पाष्टे, ज्येष्ठ लोकशाहीर सिताराम शिंदे, शाहीर यशवंत कळंबटे, तालुका अध्यक्ष शाहीर झराजी वीर, उपाध्यक्ष शाहीर सुरेश घाणेकर, लक्ष्मण आग्रे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन शाखेचे सचिव संदेश पालये यांनी केले.