प्रतिनिधी /पणजी
दिवसेंनदिवस वाढत असलेल्या महागाईची सर्वसामान्य लोकाना झाळ बसत आहे. सणासुदीच्या काळात लोकांना कर्ज काढून सण साजरे करावे लागतात. तोंडावर आलेली गणेश चतुर्थी साजरी कशी करावी असा प्रश्न लोकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे गणपती बाप्पा तु तरी भाजप सरकारला सुबुध्दी दे आणि महागाई कमी करण्यास भाग पाड अशी अशी प्राथर्नां काँग्रेस कार्यकर्त्यानी केली आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथील मोर्केटमध्ये महागाई पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी वरील याचना केली आहे. यावेळी सांतक्रूझचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस, हळदोणा आमदार कार्लुस फरेरा, प्रदेश युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रदेश महिला अध्यक्ष बिना नाईक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱया केंद्र तसेच राज्य सरकाचा निषेध करीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य लोकांचे कंबरडे मोडीस आले असून भाजप केवळ सत्ता उपभोगण्यात व्यस्त असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेस पक्षाला सर्वसामान्य माणसांच्या अडचणीची जाण आहे म्हणून काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर येत आहे. आता लोकांना हे समजणे गरजेचे आहे. सत्तेपाई मदांद झालेल्या भाजपला त्यांची जागा दाखवा तरच महागाई कमी होईल. असे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांनी पेले आहे. यावेळी रुडाल्फ फर्नांडिस, वरद म्हार्दोळकर व बिना नाईक यांची भाषणे झाली.