चिपळूण प्रतिनिधी
वाढत्या पावसाने वशिष्ठ नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासनाने दक्षतेचा ईशारा दिला असतानाच गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख पुलाजवळून एक गाई व एक म्हैस वशिष्ठी नदीत वाहून गेल्याची बातमी येत आहे.
दरम्यान, जुना कॉटेज येथे पाणी पातळी वाढल्यामुळे तीन ट्रान्सफॉर्मर ( जुना कॅाटेजजवळील 2 व खडस मॅालजवळील 1) 12.30 वाजता बंद करून ठेवले आहेत. साधारणतः 250 ग्राहकाचा विद्युत पुरवठा बंद आहे.
भेंडी नका येथील १ ट्रान्सफॉर्मर 1.20 वाजता बंद करून ठेवला आहे साधारणतः 100 ग्राहकाचा विद्युत पुरवठा बंद आहे. परशुराम घाटातील रस्ता दरड कोसळल्याने वाहतुकीकरीता बंद केलेला आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे.