खरेदीला उधाण : परतीच्या पावसामुळे सकाळच्या सत्रात खरेदीला पसंती
प्रतिनिधी / बेळगाव
लखलखणाऱया दिव्यांच्या दिवाळी सणासाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. कोरोनानंतर यंदाच्या दिवाळीसाठी नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे बाजारात किराणा, फटाक्मयांची दुकाने,
इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडय़ांची दुकाने, मिठाईची दुकाने, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने आदी ठिकाणी गर्दी दिसत आहे. परतीच्या पावसामुळे नागरिकांनी सकाळच्या सत्रात खरेदीला पसंती दिली होती. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी झाली होती.
प्रकाशाचा झगमगाट करणारे आकाशकंदील दिवे, पणत्या आणि पूजेचे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. विविध डिझाईन आणि आकारातील आकाशकंदील नागरिकांचे आकर्षण ठरत आहेत. कोरोनानंतर सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. मात्र महागाई अधिक वाढल्याने नागरिकांचा हिरमोड झाला आहे.
गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मेणसे गल्ली, कडोलकर गल्ली, काकतीवेस, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली आदी ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढत आहे. दरम्यान परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने बाजारपेठेवरदेखील याचा परिणाम होत आहे. शिवाय पावसामुळेच शुक्रवारी सकाळच्या सत्रात बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढली होती. किराणा दुकानात पोहे, फुटाणे, शेंगदाणे, नारळ यासाठी तर पूजेचे साहित्य, आकाशकंदील, पणत्या, दिवे रांगोळी आदींना मागणी वाढली आहे. त्याचबरोबर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीला पसंती दिली जाते. त्यामुळे टीव्ही, दुचाकी शोरूममध्येदेखील नागरिकांची वर्दळ अधिक होती.
सोमवारी नरक चतुर्दशी-लक्ष्मी पूजन
शुक्रवारपासून दिवाळीला प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी वसुबारस, शनिवारी धनत्रयोदशी, सोमवारी नरक चतुर्दशी व लक्ष्मी पूजन तर बुधवारी पाडवा व भाऊबीज आहे. त्यामुळे खरेदीसाठी शुक्रवारपासून बाजारात नागरिकांची गर्दी वाढत आहे. लक्ष्मी पूजन आणि पाडव्याच्या खरेदीसाठी आबालवृद्ध बाहेर पडत आहेत.