वृत्तसंस्था/ पॅरीस (फ्रान्स)
फ्रान्समध्ये सध्या सुरू असलेल्या 2022 च्या सायकलिंग ट्रक विश्व चॅम्पियन्स स्पर्धेत भारताचा अव्वल सायकलपटू इसो अल्बनने पुरुषांच्या कायरिन प्रकारात गुरुवारी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
अल्बनने या क्रीडा प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिसरे स्थान पटकाविले. या कामगिरीमुळे 21 वर्षीय अल्बनने सायकलिंग ट्रक विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत नवा इतिहास घडविला. या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा तो भारताचा पहिला सायकलपटू आहे. या क्रीडा प्रकारात फ्रान्सचा मेल्विन लँडेरनियु, जपानचा तेरासाकी, कजाकस्तानचा पोनोमॅरोव्ह, मलेशियाचा फिरदौस सहरोम आणि हॉलंडचा लॅव्हरेसेन यांनीही उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.