युवा रक्तदाता संघटनेची तत्परता
ओटवणे प्रतिनिधी
ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नवजात बालकाला (ओ- निगेटिव्ह) या दुर्मिळ रक्तगटाच्या प्लेटलेट्सची अत्यंत तातडीची गरज असताना युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सागर साळगावकर यांनी प्लेटलेट्स दान केले. त्यामुळे या नवजात बालकाला जीवदान मिळाले असून सागर साळगावकर या युवकासह युवा रक्तदाता संघटनेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.
या नवजात बालकाच्या कुटुंबीयांनी प्लेटलेट्सची तात्काळ गरज युवा रक्तदाता संघटना यांना सांगताच देव्या सुर्यांजी यांनी त्वरीत सागर साळगावकर यांना संपर्क केला. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सागर साळगावकर यांनी पोरस येथे जात प्लेटलेट्स दान केले. यावेळी या नवजात बालकाच्या कुटुंबीयांनी सागर साळगावकर तसेच युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्यांजी यांचे आभार मानले.