पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून कार्यवाही
बेळगाव : उत्सव काळासह इतरवेळीही कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, समाजात शांतता नांदावी, यादृष्टीने सुरक्षा व्यवस्थेवर अधिक भर देण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी आवारात श्वानपथकाकडून तपासणी करण्याचे कार्य कायम ठेवण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाकडून उत्सवकाळामध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला जातो. याबरोबरच अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती केली जाते. तसेच राखीव पोलीस दलाकडून पथसंचलन करण्यात येते. पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्या आदेशावरून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नियमित तपासणी करण्यात येत आहे. श्वानपथकाकडून दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागात महत्त्वाच्या गर्दीच्या ठिकाणी शासकीय कार्यालये, रेल्वेस्थानक, न्यायालय आवार या ठिकाणी तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर श्वानपथकाकडून तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. श्वानपथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नियमित तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा अधिकारी कार्यालय, प्रादेशिक आयुक्त न्यायालय आवारात नियमित तपासणी करण्यात येत आहे. याबरोबरच रेल्वेस्थानक अशा महत्त्वाच्या ठिकाणीही तपासणी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार श्वानपथकाच्या साहाय्याने तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले.