भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस; भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल
नवारस्ता / प्रतिनिधी
कोयना धरण परिसर आज शुक्रवारी पहाटे भूकंपाच्या सौम्य धक्याने हादरवून टाकले. शुक्रवार (दि.28 ऑक्टोबर) पहाटे सकाळी 6 वाजून 34 मिनिटांनी कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
भूकंपमापन केंद्रांवर या भूकंपाच्या धक्क्याची तीव्रता 2.8 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेल्याची माहिती कोयना भूकंप प्रशासनाने दिली.
भूकंपाच्या केंद्रबिंदूचे अंतर कोयना धरणापासून 12 किलाे मीटर अंतरावर हेळवाक गावच्या नैऋत्येस 5 किलोमीटर इतकी नोंद झाली आहे. दरम्यान, सध्या कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून या भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका झाला नसून धरण सुरक्षित असल्याचा निर्वाळा कोयना धरण व्यवस्थापना कडून देण्यात आला.