इचलकरंजी, प्रतिनिधी
Ichalkarnji Crime News : शहरातील जय सांगली नाक्याच्या भर चौकामध्ये एका व्यक्तीवर पूर्ववैमस्यातून सहा जणांनी खूनी हल्ला करुन गंभीर जखमी केले. राजेश कृष्णा कुंभार (रा.जय सांगली नाका, शिव मंदीर जवळ, इचलकरंजी )त्यांचे नाव आहे. या हल्यात संशयीत आरोपींनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडचा वापर केला आहे. या प्रकरणी गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला असून,सहा संशयीतापैकी इसाक वजीर तराळ,त्याचा मुलगा तौहिद इसाक तराळ, हिदायततुला मुसा तेलसंग (सर्व रा.जय सांगली नाका, इचलकरंजी ) या तिघांना बुधवारी दुपारी पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन महिला संशयीत आरोपी पसार आहेत.
जखमी राजेश कुंभार आणि संशयीत आरोपी इसाक तराळ यांच्यात पूर्वी भांडण झाले होते.या भांडणाचा राग मनात धरून,आमच्या घरासमोर दगड का टाकला कारणावरून चिडून जावून संशयीत आरोपी तराळ यानी सहा जणाचे टोळके तयार केले.या टोळक्याच्या मदतीने त्याच्यावर शहरातील जय सांगली नाक्याच्या भर चौकात संशयीत आरोपी इसाक तराळ व त्यांच्या मुलाने तुला मस्ती आली आहे का तुला आता जिवंत सोडत नाही.असे म्हणून इसाक तराळ याने लाकडी दांडक्याने त्याच्या मुलगा तौहिदने लोखंडी रॉडने तर अन्य संशयीतानी लाथाबुक्यांनी मारहान करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.या खूनी हल्ल्यात जखमीच्या डोक्यात आणि डाव्या हाताच्या मनगटावर दुखापत झाली आहे.
याविषयी गावभाग पोलिसात इसाक वजीर तराळ,त्यांची पत्नी ( पूर्ण नाव माहित नाही ),त्याचा मुलगा तौहिद तराळ,त्याचा शेजारी हिदायततुला तेलसंग, पटेल यांची पत्नी आणि शेजारील अपार्टमेंटमध्ये राहणारी भाभी ( पूर्ण नाव माहित नाही.सर्व रा.जय सांगली नाका, इचलकरंजी )या सहा जणाविरोधी गुन्हा नोंद झाला.पोलिसांनी सहा संशयीतापैकी इसाक तराळ,त्याचा मुलगा तौहिद तराळ,हिदायततुला तेलसंग या तिघांना अटक केली आहे.