वृत्तसंस्था/ मार्सेली (फ्रान्स)
2024 साली फ्रान्समधील पॅरीस येथे होणाऱया ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या क्रीडा ज्योतीच्या रॅलीला मार्सेलीपासून प्रारंभ होणार असल्याची घोषणा स्पर्धा आयोजकांनी केली आहे.
या स्पर्धेच्या क्रीडा ज्योती रॅलीचा पहिला थांबा मार्सेली राहिल. या स्पर्धेच्या क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन ऑलिम्पिया येथे केले जाणार आहे. दक्षिण फ्रान्समधील मार्सेली या शहरापासून या क्रीडा ज्योतीच्या प्रवाशाला प्रारंभ होईल. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धा क्रीडा ज्योत रॅलीचा प्रवास मोठा राहिल. फ्रान्सची राजधानी पॅरीस येथे 26 जुलै 2024 रोजी ऑलिम्पिक स्पर्धेचे उद्घाटन मोठय़ा प्रमाणात करण्यात येईल. पॅरीस ऑलिम्पिक क्रीडा ज्योत रॅलीला एप्रिल 2024 पासून प्रारंभ होईल. येत्या मे महिन्यात पॅरीस ऑलिम्पिक क्रीडा ज्योत रॅलीच्या प्रवासाचा मार्ग जाहीर केला जाईल. पॅरीस ऑलिम्पिक क्रीडा ज्योतीचे स्वागत मार्सेलीमध्ये सुमारे 800 ऍथलिट्स करतील. पॅरीस ऑलिम्पिक क्रीडा ज्योत म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रमुख परंपरा आणि जनता यांच्यातील शांतता, दृढता आणि जिव्हाळा यांचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेच्या क्रीडा ज्योत रॅलीला पुढील वर्षी प्रारंभ होईल, अशी माहिती पॅरीस ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष टोनी इस्टेनग्युएट यांनी दिली.