माहितीपट प्रकरणी कठोर कारवाईची विनंती
अहमदाबाद / वृत्तसंस्था
गुजरात विधानसभेने बीबीसीच्या वादग्रस्त माहितीपटाच्या विरोधात ठराव मंजूर करून केंद्राला बीबीसीवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली. बीबीसीने 2002 च्या घटनांना आपल्या माहितीपटात चुकीचे चित्रण केले आहे. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे भाजपचे आमदार विपुल पटेल यांनी सभागृहात ठराव मांडताना सांगितले. विपुल पटेल यांच्या प्रस्तावाला भाजप आमदार मनीषा वकील, अमित ठाकर, धवल सिंग जाला यांच्यासह मंत्री हर्ष संघवी यांनीही पाठिंबा दिला. यावेळी झालेल्या चर्चेत अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवत बीबीसीवर कठोर कारवाईची विनंती केली.