साहिलच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप
रत्नागिरी प्रतिनिधी
रत्नागिरीतील साहिल मोरेच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेल्या मैत्रिणीला सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल़ा. मिताली अरविंद भाटकर (24, ऱा तोणदे रत्नागिरी) असे आरोप असलेल्या या मैत्रिणीचे नाव आह़े साहिल याच्या बहिणीकडून शहर पोलिसांत मिताली हिच्याविरूद्ध तकार दाखल करण्यात आल्याने शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा. त्यानुसार अटकेच्या भीतीने मिताली हिने सत्र न्यायालयापुढे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होत़ा.
साहिल विनायक मोरे (22, ऱा अलावा रत्नागिरी) या तरूणाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी शहरालगतच्या साईभूमीनगर येथे मैत्रिणीच्या फ्लॅटवर आत्महत्या केली होत़ी. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, साहिल व त्याची मैत्रिण मिताली हे दोघेही रत्नागिरीमधील वाहन विकीच्या शोरूममध्ये कामाला होत़े या ठिकाणी त्यांच्यात ओळख होवून पेमसंबंध निर्माण झाल़े. दरम्यान साहिल याने मिताली हिला लग्न करण्यासंबंधी विचारणा केली होत़ी. याला मिताली हिने लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार दिल़ा. यातूनच साहिल याने साईभूमीनगर येथील मैत्रिणीच्या फ्लॅटवर गळफास घेवून आत्महत्या केली होत़ी.
मिताली ही लग्नाला नकार देत असल्याने आपली बदनामी होईल, या भीतीने साहिल याने गळफास घेवून आत्महत्या केली, अशी तकार साहिल याची बहीण कृतिका विनायक मोरे हिने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी साहिल याची मैत्रिण मिताली हिच्याविरूद्ध पोलिसांकडून भादंवि कलम 306 नुसार गुन्हा दाखल केल़ा. सत्र न्यायालयात चाललेल्या अटकपूर्व जामिनाच्या सुनावणीवेळी सरकारी पक्षाकडून मिताली हिच्या अटकपूर्वला विरोध केल़ा.
सरकारी वकिलांनी यावेळी सांगितले की, मिताली हिच्याविरूद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े. तसेच या पकरणाचा तपास अद्याप अपुरा आह़े. मिताली हिला जामीन मंजूर केल्यास ती तकारदार व साक्षीदार यांना धमकावण्याची शक्यता आह़े. मृत साहिलच्या अन्य मैत्रिणीच्या टिपणानुसार मिताली ही घटनेच्यावेळी साहिलसोबत होत़ी त्यांच्यातील संभाषण जाणून घेणे तपासाच्या दृष्टीने गरजेचे आह़े त्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात यावा, अशी मागणी सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे करण्यात आल़ी.
दरम्यान न्यायालयाने आपल्या निकालपत्रात असे म्हटले की, भादंवि कलम 306 नुसार आत्महत्या करण्यास पवृत्त केले अथवा चिथावणी दिली किंवा कट रचला, असे आढळून येणे गरजेचे आह़े साहिल मोरेची आत्महत्या झाल्यानंतर 6 दिवसांनी बहीण कृतिका हिने तकार दाखल केली. मिताली व साहिल यांच्यात मागील काही महिन्यांपासून पेमसंबंध होत़े यावेळी मिताली हिने लग्न करण्यास संमती दर्शवली होत़ी मात्र मागील 2 महिन्यांपासून मितानीने साहिल याला लग्न करण्यास नकार दर्शवला होत़ा लग्न करण्यास नकार दिल्याने कुटुंबाची बदनामी हाईल, या भीतीने साहिलने आत्महत्या केल्याचे तकार अर्जात म्हटले आह़े.
साहिल व मिताली हे दोन्ही कायद्याने सज्ञान होत़े. अशावेळी मिताली हिने लग्न करण्यास नकार देवून साहिल याला आत्महत्या करण्यास चिथावणी दिली. अथवा पवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालाने नोंदवल़े न्यायालयाने यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने विवेक राजेश मौयाविरूद्ध महाराष्ट्र शासन या निकालपत्राचा सिद्धांत सांगितल़ा. त्यानुसार मिताली हिला न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात आल़ा मात्र दोषारोपपत्र दाखल होईपर्यत दर रविवारी तपास अधिकाऱयांपुढे हजेरी लावावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़