अत्यंत दुर्मीळ आफ्रिकन पँगोलीन प्रजाती
उदय सावंत /वाळपई
घनदाट जंगलाची समृद्ध परंपरा लाभलेल्या सत्तरी तालुक्मयाच्या जंगलामध्ये दुर्मीळ प्राणी अजूनही शिल्लक असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. आता या जंगलांमध्ये खवले मांजराचे अस्तित्व आजही अबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोतोडे जंगलामध्ये काल बुधवारी खवले मांजर टाकीमध्ये पडल्याचे आढळून आले. निसर्गप्रेमी आयुष्य केरकर यांनी त्याला जीवदान देऊन वन खात्याच्या स्वाधीन केले.
खोतोडे येथील रबर लागवडीमध्ये खवल्या मांजर टाकीत पडल्याची माहिती मिळाल्यानंतर आपण घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्याला सुरक्षितरित्या टाकीतून बाहेर काढून सुरक्षित ठेवले. हे खवल्या मांजर दुर्मीळ जातीचे आहे. वन खात्याला माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती आयुष्य केरकर यांनी दिली.
त्वचेचे रक्षण करतेय खवले
हे खवले मांजर आफ्रिकन जातीचे आहे. या मांजराच्या अंगावर अनेक खवले आहेत. खवल्या मांजर (इंग्लिशमध्ये पँगोलीन Pangolin) हा फॉलिडोटा वर्गातल्या मॅनिडी कुळातील मॅनिस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा आफ्रिका व आशिया इथल्या उष्ण कटिबंधीय भागांमध्ये आढळतो. ज्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते असा हा एकमेव सस्तन प्राणी आहे. हे खवले शृंगप्रथिन या पदार्थापासून बनलेले असतात. मॅनिडे या विद्यमान कुटुंबात तीन पिढय़ा आहेत. मॅनिस, ज्यात आशियामध्ये राहणाऱया चार प्रजाती आहेत; आफ्रिकेत राहणाऱया दोन प्रजातींचा समावेश असलेल्या फॅटागिनस; आणि स्मट्सय, ज्यात आफ्रिकेत राहणाऱया दोन प्रजातींचा समावेश आहे. या प्रजातीचा आकार 30 ते 100 सेमी (12 ते 39 इंच) पर्यंत असतो.
अपत्त्यांना दोन वर्षे वाढवितात
हे खवल्या मांजर पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतात. खवल्या मांजर निशाचर आहेत आणि त्यांच्या आहारात प्रामुख्याने मुंग्या आणि वाळवी असतात, जे ते आपल्या लांब जीभ वापरून घेतात. ते केवळ प्रजननासाठी भेटतात आणि सुमारे एक ते तीन अपत्यांची पैदास करून त्यांना दोन वर्षे वाढवतात. खवल्या मांजराच्या मांसासाठी आणि तराजूंसाठी शिकार केली जाते. त्यांच्या नैसर्गिक निवासस्थानाच्या जंगलतोडीतून पेंगोलिनला धोका निर्माण झाला आणि ते दुर्मीळ होत गेले.
सत्तरीचे जंगल संशोधनासाठी माहितीचा खजाना : केरकर
आयुष्य केरकर यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयाच्या जंगलाची रक्षण करण्याची प्रक्रिया प्रत्येकाने हाती घेणे आज काळाची गरज बनलेली आहे, कारण जंगलाच्या माध्यमातून आपले जीवन निरोगी राहण्यास मदत होत असते. सत्तरी तालुक्मयाने घनदाट जंगलाची परंपरा अजूनही कायम ठेवलेली आहे. आपल्या पूर्वजांनी घनदाट जंगलाची परंपरा संवर्धित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. यामुळेच आज खवल्या मांजर सारखे दुर्मीळ प्राणी या जंगलांमध्ये अधिवासात आहेत. येणाऱया काळात सत्तरी तालुक्मयाचे जंगल हे प्रत्येकासाठी संशोधन व माहितीसाठी खजाना आहे, असेही ते म्हणाले.